पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सातनाळ आणि मंडप धबधबा

इमेज
नोव्हेंबर महिन्यातील दमछाक करायला लावणारं ऊन आणि त्यातच चालून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीचं औचित्य साधून आमची उन्हातान्हात भटकणारी शरीर-मन सातनाळेतील मंडप धबधब्याखाली गारेगार करण्याची एक विराट योजना आखली."भटकंती घाटवाटांची" या डॉ. प्रीती पटेल यांच्या पुस्तकातील मंडप धबधबा आणि सातनाळ घाटवाटेचा लेख वाचल्यापासूनच मनात घर करून बसला होता. पण सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, कोरोना आणि वाढलेलं लॉकडाऊन यांमुळे  घराबाहेर पडणचं मुश्किल झालं होतं. वाढलेली कामे आणि कोरोना यांतून उसंत मिळताच, आम्ही महाडवरून उंबर्डी गावाच्या दिशेने रवाना झालो. दरवेळी प्रमाणे अलिबागचा वाघ म्हणजे आमचा भोप्या बऱ्याच दिवसांनी ट्रेकला जायचं म्हणून आमच्या आधीच माणगाव मध्ये दाखल झाला होता. महाड- माणगाव- निजामपूर- कडापे- जिते  असा ५५ किलोमीटरचा प्रवास करून उंबर्डी गावात दाखल झालो. उंबर्डी नदीच्या तिरावर असलेलं हेमाडपंथी शिवमंदिर आणि त्यामागील मोसे खोऱ्यात दिमाखाने उभा असलेला कुर्डुगडाचा सुळका रस्त्यावरूनचं आमचं लक्ष वेधून घेत होता. फक्त दगड एकावर-एक रचून हे मंदिर उभारलं आहे. मंदिराच्या प्रांगणात बऱ्याच वीरगळ आणि सतीशिळा ...

अल्पपरिचित गडकिल्ले - मिरगड

इमेज
पेण शहराजवळ असलेल्या महाल मिऱ्या डोंगररांगेच्या शेवटच्या भागांत छोटेखानी मिरगड किल्ला आहे. मिऱ्या डोंगराचा थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करण्याचा ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मिरगड किल्ल्यावर जाण्यासाठी कोंढवी आणि पाचगणी अशा दोन्ही गावातून वाटा आहेत. पेण-वडखळ-कासु-पाबळ-कोंढवी ( बिरडावाडी ) असा २७ किलोमीटरचा प्रवास करून गडाच्या पायथ्याला पोहचता येते. या वाटेने आपण गडाच्या पदरात पोहचतो. समुद्रसपाटीपासून साधारणतः ३५० मीटर उंचीची गडाची दोन्ही शिखरे समोरूनच आपलं लक्ष वेधून घेतात. प्रथम डावीकडील शिखरमाथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर तासाभरातच आपण दोन शिखरांमधील खिंडीत पोहचतो. मिऱ्या डोंगराजवळील कुरवाड या गावाजवळ कलात्मकरीत्या कापलेले दगड सापडतात. नजीकच्या तलावात अनेक भग्न मूर्ती असल्याचे लोक सांगतात. दुसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी पेण-बोरगाव-महालमीऱ्या-पाचगणी असा २० किलोमीटरचा प्रवास करून आपण पाचगणी गावात दाखल होतो. याच वाटेने गडावर जाताना माचीवरील वाघेश्वराचे दर्शन सुद्धा घेता येते. पाचगणी पठाराच्या शेवटच्या भागात किल्ला असल्याने समोर दिसणाऱ्या पहिल्य...

अल्पपरिचित गडकिल्ले - रत्नगड उर्फ रतनगड

इमेज
पेण तालुक्यातील मिऱ्या आणि तिलोरे डोंगररांगेला जोडणाऱ्या टेकडीवर रतनगड उर्फ रत्नगड नावाचा  अपरिचित किल्ला वसलेला आहे. पेण-खोपोली मार्गावर कामार्ली फाट्यावरून वारवणे-सायमाळ असा १७ किलोमीटरचा प्रवास करून आपण किल्ल्याजवळील गावात पोहचतो. साय/सैतानमाळ गावाच्या खालच्या बाजूस असलेल्या टेकडीवर आणि रत्ना नदीकाठी हा किल्ला आहे (उ. १८°४१' २९.४६'' पू. ७३°०९' २८.५३''). समुद्रसपाटीपासून सुमारे ४०० मी उठवलेला हा किल्ला,त्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यामुळे सायमाळ गावातून आपलं लक्ष वेधून घेतो. याच सैतान/सायमाळावर शिवाजी महाराजांचा सेनापती आबाजी सोनदेव याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला होता. किल्ल्याचा आकार पाहता याचा वापर संरक्षक वसाहत किंवा टेहळणीसाठी केला गेला असावा.  रतनगड उर्फ रत्नगड हा किल्ला बाबूराव पाशीलकर नावाच्या माणसाने बांधला. शायिस्ताखानाने हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण गडाचा किल्लेदार कावजी कोंढाळकर याने निकराने लढा दिला. मिऱ्या डोंगराच्या या परिसराचा, थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करण्याचा ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ...