पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

इमेज
       कोकणातील मंदिर म्हटलं की डोळ्यासमोर येतं छान कौलारू मंदिर...समोर दीपमाळ, तुळशी वृंदावन, आजूबाजूला झाडी…या वर्णनाला न्याय देणारं आणि सोबत एक अनोखं वैशिष्ट्य असलेलं प्राचीन मंदिर म्हणजे शिरंबे गावचं मल्लिकार्जुन मंदिर !!. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावात 'एकमेव जलमंदिर' अशी ओळख असलेलं मल्लिकार्जुन देवस्थान आहे. निबिड अरण्यात विसावलेल्या शिरंबे गावात पोचण्यासाठी, मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे - वहाल - शिरंबे असा २० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. थोडी वाट वाकडी करून बुरुंबाड गावात हेमाडपंथी शैलीचे आमनायेश्वर मंदिर आहे, त्यालाही भेट देता येते.  शिरंबे गावात शिरताच दुतर्फा कोकणातील टुमदार घरं आपलं स्वागत करतात. गाव पार करून गेलं की दाट झाडीतून मल्लिकार्जुन मंदिर डोकावताना दिसतं. मंदिराच्या प्रांगणातील दोन दीपमाळा आणि वृंदावन आपलं लक्ष वेधून घेतात. पाण्यातलं हे अनोखं मंदिर बघता क्षणी आपल्याला गारव्याची अनुभूती देतं. याच प्रांगणात वरदायिनी वरदान व चंडकाई देवीची मंदिरे आपण पाहू शकतो. इथे कलाकृतीचा नजारा दिसला नाही, तरी कोकणची लोककला आणि...

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ

इमेज
युद्धप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्र आणि कर्नाटकात बऱ्याच वीरगळी उभारलेल्या दिसतात. मुंबईतील बोरिवलीजवळील एक्सर गावात, सेंट लॉरेन्स शाळेजवळ या सहा विरगळी आहेत. एक्सरच्या खाडीत झालेल्या युद्धाची आठवण करून देणाऱ्या ह्या सहाफुट उंचीच्या वीरगळी आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पहिल्या दोन वीरगळी ह्या जमिनीवरील युद्धप्रसंग दर्शवतात, त्यात चिलखती हत्तीसमवेत धारातीर्थी पडलेल्या वीरांचे चित्रण केलेले आहे. तर उर्वरित चार वीरगळींवर नौदल युद्धांची दृश्ये कोरलेली आहेत. तिसऱ्या विरगळीवर चार पटल आहेत. पहिल्या पटलावर पाच शिड्यांची जहाजे असून त्यात युद्धासाठी सज्ज असलेले सैनिक आणि वल्हे मारणारे शिपाई दिसून येतात. दुसऱ्या पटलावर चार जहाजे एका मोठ्या जहाजावर हल्ला करत आहेत आणि त्यामुळे जहाज व समुद्रात होणारी जीवितहानी दाखवली आहे. याच पटलावर एक अस्पष्ट शिलालेख आहे. तिसरा आणि चौथा भाग स्वर्गलोकप्राप्ती झाल्याचा आहे. चौथी वीरगळ ही आठ पटलांची आहे. पहिल्या पटलावर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैनिकांची अकरा जहाजे, त्यांच्या उंच डोलकाठ्या आणि वल्ही दाखवली आहेत....

निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प

इमेज
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर  दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.   जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फा...