नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ
चौथी वीरगळ ही आठ पटलांची आहे. पहिल्या पटलावर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैनिकांची अकरा जहाजे, त्यांच्या उंच डोलकाठ्या आणि वल्ही दाखवली आहेत. दुसऱ्या पटलावर उजवीकडून येणाऱ्या बोटीने समोर असलेल्या पाच जहाजांवर हल्ला चढवलेला दिसतो. तिसऱ्या पटलावर विजयानंतर परतणारी नऊ जहाजे दिसतात. चौथ्या पटलावर सैनिक जहाजातून उतरताना दिसत आहेत. पाचव्या भागात सैन्य दाखवले आहे जे प्रतिष्ठित व्यक्तींसोबत मोर्चा काढत आहेत. वरच्या बाजूंस अमृतकुंभ असून त्याखाली स्वर्गलोक प्राप्त झालेला वीर चित्रित केलेला दिसतो. पाचव्या विरगळीवर चार पटल आहेत. पहिल्या भागांत सैन्य, सात जहाजे आणि छताखाली विराजमान झालेला त्यांचा मुख्य अधिकारी दाखवला आहे. दुसऱ्या पटलावर प्रत्येकी तीन जहाजे डावीकडून आणि उजवीकडून लढाईकरिता पुढे येत आहेत. उर्वरित दोन पटलांमध्ये शिवलिंगाची पूजा करणारा वीर आणि सुरांगनांची दृश्ये आहेत.
सहावी वीरगळ ही दोन पटलांची आहे. खालच्या भागांत जहाजांवरील सैन्य युद्धात गुंतलेले दाखवले आहे आणि वरच्या पटलावर एक योद्धा बसलेला दाखवला आहे. एक्सरच्या काही वीरगळींवर शिलालेख आहेत, परंतु त्यांची झीज झाल्यामुळे शिलालेखांचा उलगडा होऊ शकत नाही. अन्यथा या नौदल युद्धात नेमके कोण सहभागी होते आणि त्याची नेमकी तारीख कळू शकली असती. या प्रदेशाचा इतिहास आणि नौदल युद्धात कोणत्या प्रकारच्या कलाकुसरीचा वापर केला जातो, या दोन्ही दृष्टीने या वीरगळी महत्त्वाच्या आहेत. कालपरत्वे या वीरगळींना मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्बल लावल्यामुळे जमिनीत गाडली गेली आहेत.
शिलाहारांचा राजा सोमेश्वर याने साधारण १० वर्षे राज्य केले. त्याच काळात यादवांची वक्रदृष्टी या प्रदेशावर .पडली. अनेक प्रयत्न करूनही यादवांना शिलाहारांचा संपूर्ण पाडाव करता येत नव्हता. त्या भागांतील बंदरे आणि आर्थिक सुबत्ता यादवांना खुणावत होती. म्हणूनच १२६५ मध्ये यादव राजा महादेव याने मोठे सैन्य घेऊन सोमेश्वरावर स्वारी केली. या सैन्यात चिलखती हत्तींचाही समावेश होता. निकराची लढाई झाली, त्यात सोमेश्वराचा पाडाव होऊ लागला. हे लक्षात येताच त्याच्या युद्धनौका घेऊन तो समुद्रात उतरला. महादेवाने त्याचा पाठलाग केला. समुद्रातही घनघोर युद्ध झाले. महादेवाने शेवटी सोमेश्वराला त्याच्या युद्धनौकेसह जलसमाधी दिली आणि मुंबईच्या इतिहासातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. सोमेश्वराचे अंत्यसंस्कार समुद्रकाठच्या एक्सर गावात करण्यात आले. एक्सरच्या वीरगळींची भव्यता आणि त्यावरील अंकनांचा तपशील पाहता, यावर चित्रित केलेले युद्ध कोणतेही लहान युद्ध नसावे आणि म्हणूनच ह्या विरगळी आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
संदर्भसूची :-
1) S Tripathi - Ships on Hero Stones from the West Coast of india.
सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🏻
हटवाkeep writing, it's nice blog.
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवासुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🏻😊
हटवामी आज पाहून आलो या वीरगळी...
उत्तर द्याहटवाखूपच छान 😊✨
हटवा