पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवसाला पावणारा उभादेव

इमेज
       'येवा कोकण आपलाच आसा' असं दिलखुलास आमंत्रण देणारा सिंधुदुर्ग जिल्हा ! आपल्या मालवणी बोलीने आणि जेवणाने सर्वदूर प्रसिद्धी झाला. शिवरायांनी स्वतः बांधलेल्या मालवणजवळील सागरी किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त आवर्जून भेट द्याव्या, अशा अनेक निसर्गरम्य जागा जिल्ह्यात आहेत. तळकोकणातील मंदिरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे देखणी आहेतच. तशीच गूढ आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेली देवस्थानेदेखील जिल्ह्याच्या परिसरात प्रसिद्ध आहेत. असेच एक अनोखे देवस्थान आहे, 'श्री उभादेव'…        गडनदी आणि जनवली नदीच्या काठावर वसलेल्या कणकवलीजवळ हे मंदिर आहे. कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर वागदे गावाच्या सीमेवर उभादेव हे जागृत देवस्थान वसलेले आहे. रस्त्यालगत असेलेल्या वाहनतळापाशी 'श्री उभादेव प्रसन्न' अशी कमान आपलं स्वागत करते. गड नदीच्या तीरावर गर्द झाडीमध्ये विसवलेल्या महाकाय वृक्षाच्या छायेत साधारणतः २५ फूट उंचीची एक शिळा उभादेव म्हणून पुजली जाते. नजीकच्या रत्नगिरी आ...

देगाव येथील दशानन / रावणाचे अंकन केलेली वीरगळ

इमेज
             युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते वीर चंद्र-सूर्य असेपर्यंत आपल्या स्मरणात राहावे यासाठी कर्नाटकांतून आलेल्या ह्या शिल्पप्रकाराला वीरगळ संबोधले गेले. अनेक विस्मरणात गेलेले शूर आणि पराक्रमी योद्धे यांच्या स्मरणार्थ केलेलं हे एक स्मारक म्हणजे इतिहासाचे मूक साक्षिदार. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या वीरगळ आढळतात, त्यांतील वीरगळींवर अंकण केलेल्या लढाया, सशस्त्र सैनिक, लढाईसाठी सज्ज असलेले घोडदळ किंवा  पायदळ, सागरी युद्ध, गोधनाचे रक्षणकर्ते, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करतानाचे शिल्पकारांनी केलेले हे सजीव सादरीकरण खूपच बोलकं आहे. आयताकृती (फक्त समोरील बाजूस अंकण केलेली) आणि स्तंभ वीरगळी (चारही बाजूंनी अंकण केलेली) असे वीरगळीचें मुख्य प्रकार पडतात. सर्वात खालच्या बाजूस वीर झोपलेला आणि ज्या कारणांमुळे वीरमरण आले त्या लढाईचे किंवा प्रसंगाचे चित्रण असते. त्याच्या वरच्या भागात वीर अप्सरांबरोबर किंवा स्वर्गरोहण चित्रण केलेले असते. शेवटच्या टप्प्यात वीर एकटा किंवा पत्नीसह शंकराच्या पिंडीची पूजा करताना म्हणजेच मोक्षप्राप्त...

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

इमेज
           आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत सर्वांनीच सुरक्षिततेसाठी नैसर्गिक गुहा व पुढील काळात भिंती, तटबंदी इत्यादी बांधकामाचा वापर केलेला दिसतो. इ.स.पूर्व ३५०० ते ६०० दरम्यान ईजिप्शियन संस्कृतीच्या काळातील राजवाडे तटबंदी, बुरूज आणि भोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले होते. इ.स.पूर्व २००० - १७७६ दरम्यान म्हणजेच बाराव्या राजवंशाच्या वेळी “सेम्ना” हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटापर्यंत चालू राहिली. प्रत्येक राजवटीत भौगोलिक परिस्थितीनुसार गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट या प्रकारच्या गडकोटांची उभारणी केलेली दिसते. युद्धनीतीनुसार किल्ल्यामध्ये खंदक, बुरुज, दरवाजे, तटबंदी, माची, कोठारे आणि जलव्यवस्थापन यात विभिन्नता आढळते. प्राचीन काळापासूनच कोकणात व्यापाराला चालना मिळाली होती. त्यामुळेच शहरे आणि बंदरे उदयास आली. व्यापाऱ्यांच्या प्रवासासाठी आणि निवाऱ्यासाठी घाटमार्ग, लेण्या, बारव, टाक्या आणि किल्ल्यांची बांधणी केली गेली.                     गुहागर तालुक्यातील अडूर, बोऱ्या,...