पोस्ट्स

#kamalgad #kamalgadfort #wai #कमळगड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गर्द हिरव्या वनात उठावलेला जांभ्या दगडाचा किल्ला - कमळगड

इमेज
महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट व पाचगणी परिसरातून दिसणारा वाई परगण्यातील कृष्णा आणि वाळकी नदीच्या मध्ये असलेल्या पठारावर उठावदार कातळकड्यांचा, समुद्रसपाटीपासून सुमारे १३५० मीटर उंचीचा कमळगड किल्ला ( उ. १७° ५८' २" , पू. ७३° ४४' ४१" ) आपलं नेहमीचं लक्ष वेधुन घेतो. हा किल्ला म्हणजे जणू गर्द हिरव्यादाट वनात फुललेलं लाल दगडाचं कमळचं! चहुबाजूंनी असलेल्या धारधार आणि सरळसोट कड्यांनी अभेद्य ठरणारा कमळगड उर्फ कमालगड. अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक कमावलेले व दक्षिण काशी म्हणून विख्यात असलेले वाई हे गाव भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यात आहे. वाई मधील कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंदन-वंदन या शिलाहारकालीन ( इ. स. ९०० ते १३०० ) गिरीदुर्गांची सैर करण्यासाठी मी आणि भोप्या ( रोशन भोपी ) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी महाड वरून ९० किमी चा प्रवास करून वाई बस स्थानकाजवळ पोहचलो. समोरच असलेल्या हॉटेलमध्ये गरमागरम चहा नाष्टा करून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या वासोळे गावातील तुपेवाडी गाठली. रस्त्यालगतच लागणाऱ्या मेणवली घाट, नाना फडणवीस वाडा, धोम गावातील न...