अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला
आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत सर्वांनीच सुरक्षिततेसाठी नैसर्गिक गुहा व पुढील काळात भिंती, तटबंदी इत्यादी बांधकामाचा वापर केलेला दिसतो. इ.स.पूर्व ३५०० ते ६०० दरम्यान ईजिप्शियन संस्कृतीच्या काळातील राजवाडे तटबंदी, बुरूज आणि भोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले होते. इ.स.पूर्व २००० - १७७६ दरम्यान म्हणजेच बाराव्या राजवंशाच्या वेळी “सेम्ना” हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटापर्यंत चालू राहिली. प्रत्येक राजवटीत भौगोलिक परिस्थितीनुसार गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट या प्रकारच्या गडकोटांची उभारणी केलेली दिसते. युद्धनीतीनुसार किल्ल्यामध्ये खंदक, बुरुज, दरवाजे, तटबंदी, माची, कोठारे आणि जलव्यवस्थापन यात विभिन्नता आढळते. प्राचीन काळापासूनच कोकणात व्यापाराला चालना मिळाली होती. त्यामुळेच शहरे आणि बंदरे उदयास आली. व्यापाऱ्यांच्या प्रवासासाठी आणि निवाऱ्यासाठी घाटमार्ग, लेण्या, बारव, टाक्या आणि किल्ल्यांची बांधणी केली गेली. गुहागर तालुक्यातील अडूर, बोऱ्या,...