पोस्ट्स

#veergal #eksar #eksarherostone #वीरगळ एक्सर वीरगळ Herostone लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ

इमेज
युद्धप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्र आणि कर्नाटकात बऱ्याच वीरगळी उभारलेल्या दिसतात. मुंबईतील बोरिवलीजवळील एक्सर गावात, सेंट लॉरेन्स शाळेजवळ या सहा विरगळी आहेत. एक्सरच्या खाडीत झालेल्या युद्धाची आठवण करून देणाऱ्या ह्या सहाफुट उंचीच्या वीरगळी आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पहिल्या दोन वीरगळी ह्या जमिनीवरील युद्धप्रसंग दर्शवतात, त्यात चिलखती हत्तीसमवेत धारातीर्थी पडलेल्या वीरांचे चित्रण केलेले आहे. तर उर्वरित चार वीरगळींवर नौदल युद्धांची दृश्ये कोरलेली आहेत. तिसऱ्या विरगळीवर चार पटल आहेत. पहिल्या पटलावर पाच शिड्यांची जहाजे असून त्यात युद्धासाठी सज्ज असलेले सैनिक आणि वल्हे मारणारे शिपाई दिसून येतात. दुसऱ्या पटलावर चार जहाजे एका मोठ्या जहाजावर हल्ला करत आहेत आणि त्यामुळे जहाज व समुद्रात होणारी जीवितहानी दाखवली आहे. याच पटलावर एक अस्पष्ट शिलालेख आहे. तिसरा आणि चौथा भाग स्वर्गलोकप्राप्ती झाल्याचा आहे. चौथी वीरगळ ही आठ पटलांची आहे. पहिल्या पटलावर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैनिकांची अकरा जहाजे, त्यांच्या उंच डोलकाठ्या आणि वल्ही दाखवली आहेत....