पोस्ट्स

step well लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प

इमेज
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर  दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.   जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फा...