थरार लिंगाण्याचा !
लिंगाणा ! कडसरी लिंगाणा ! अफाट लिंगाणा ! उंचच उंच लिंगाणा ! कितीही उपमा ह्याला दिल्या तरी ह्याची जाणीव आपल्याला तो नजरेनं बघितल्याशिवाय होत नाही. जेव्हापासून ट्रेकचा चस्का लागलंय तेव्हापासून सतत खुणवणारा हा पाने गावातील लिंगाण्याचा सुळका म्हणजेच रायगडाचा सोबती आणि बोराट्याच्या नाळेचा पाहरेकरी. कधीकाळी स्वराज्याच कारागृह म्हणून वापर झालेला ,अवघड चढणीचा गगनात घुसलेला साधारणतः ९०० मीटर उंचीचा हा सुळका. येथे प्रस्तरारोहण साधनांशिवाय माथा गाठणे हे आपल्या प्राणाची आहुती देण्यासारखेच आहे. दोन वर्षांपूर्वी लिंगाण्यावर जाण्याच्या बहाण्याने माझी चिंतनशी जिममध्ये ओळख झाली होती. चिंतन म्हणजे आमचा क्लाइंबिंग क्षेत्रातील गुरूचं.त्यासोबत त्याचे सर्पमित्र आणि प्राणीमित्र म्हणून काम करणारे सोबती कधी आपलेसे होऊन मी सुद्धा त्यांच्याच टिमचा एक भाग होऊन गेलो होतो.पण काही केल्या लिंगण्यावर जाण्याचा योग मात्र जुळत नव्हता. किल्ल्यावर आणि लिंगाणा माचीवर मी दोनदा गेलो होतो पण मनामध्ये ओढ होती ती लिंगाण्याचा माथा गाठण्याची . जानेवारी महिन्याच्या ३१ तारखेला रात्री चिंतनचा कॉल आला " उद्या संध्याकाळी लि...