पोस्ट्स

निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प

इमेज
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर  दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.   जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फा...

चार तालुक्यांना एकत्र जोडणारा - देवाचा डोंगर

इमेज
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड,मंडणगड,दापोली आणि रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यांच्या भौगोलिक सीमांचा केंद्रबिंदू असलेल्या देवाच्या डोंगरावरील टेपाडावर मल्लिकार्जुन/महादेवाचे मंदिर आहे. महाडहून तुळशी खिंडीमार्गे खेडकडे जाताना मंदिराचा कळस दुरूनच लक्ष वेधून घेतो. देवाचा डोंगर म्हणजे जणू एक पठारंच!! समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे पाचशे मीटर आहे. पठारावर खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक, मंडणगड-भोळावली, दापोली-जामगे आणि महाड तालुक्यातील ताम्हाणे (टेंबेवाडी) ही गावे आहेत. २०० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर चारही गावे मिळून एकूण १५० घरं आहेत व ती सर्व हाकेच्या अंतरावर आहेत. टेपाडावर असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार केलेला दिसून येतो. थेट मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. वीस ते पंचवीस पायर्‍या चढून आपला मंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात समोरील बाजूस शेंदूर लावलेला दगड व डाव्या बाजूस एक तुळशी वृंदावन नजरेस पडते. मंदिराच्या गाभाऱ्यात खोलगट भागांत शिवलिंग कोरलेलं आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात उसत्व साजरा केला जातो. त्या दिवशी मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येतात....

गर्द हिरव्या वनात उठावलेला जांभ्या दगडाचा किल्ला - कमळगड

इमेज
महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट व पाचगणी परिसरातून दिसणारा वाई परगण्यातील कृष्णा आणि वाळकी नदीच्या मध्ये असलेल्या पठारावर उठावदार कातळकड्यांचा, समुद्रसपाटीपासून सुमारे १३५० मीटर उंचीचा कमळगड किल्ला ( उ. १७° ५८' २" , पू. ७३° ४४' ४१" ) आपलं नेहमीचं लक्ष वेधुन घेतो. हा किल्ला म्हणजे जणू गर्द हिरव्यादाट वनात फुललेलं लाल दगडाचं कमळचं! चहुबाजूंनी असलेल्या धारधार आणि सरळसोट कड्यांनी अभेद्य ठरणारा कमळगड उर्फ कमालगड. अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक कमावलेले व दक्षिण काशी म्हणून विख्यात असलेले वाई हे गाव भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यात आहे. वाई मधील कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंदन-वंदन या शिलाहारकालीन ( इ. स. ९०० ते १३०० ) गिरीदुर्गांची सैर करण्यासाठी मी आणि भोप्या ( रोशन भोपी ) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी महाड वरून ९० किमी चा प्रवास करून वाई बस स्थानकाजवळ पोहचलो. समोरच असलेल्या हॉटेलमध्ये गरमागरम चहा नाष्टा करून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या वासोळे गावातील तुपेवाडी गाठली. रस्त्यालगतच लागणाऱ्या मेणवली घाट, नाना फडणवीस वाडा, धोम गावातील न...

सातनाळ आणि मंडप धबधबा

इमेज
नोव्हेंबर महिन्यातील दमछाक करायला लावणारं ऊन आणि त्यातच चालून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीचं औचित्य साधून आमची उन्हातान्हात भटकणारी शरीर-मन सातनाळेतील मंडप धबधब्याखाली गारेगार करण्याची एक विराट योजना आखली."भटकंती घाटवाटांची" या डॉ. प्रीती पटेल यांच्या पुस्तकातील मंडप धबधबा आणि सातनाळ घाटवाटेचा लेख वाचल्यापासूनच मनात घर करून बसला होता. पण सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, कोरोना आणि वाढलेलं लॉकडाऊन यांमुळे  घराबाहेर पडणचं मुश्किल झालं होतं. वाढलेली कामे आणि कोरोना यांतून उसंत मिळताच, आम्ही महाडवरून उंबर्डी गावाच्या दिशेने रवाना झालो. दरवेळी प्रमाणे अलिबागचा वाघ म्हणजे आमचा भोप्या बऱ्याच दिवसांनी ट्रेकला जायचं म्हणून आमच्या आधीच माणगाव मध्ये दाखल झाला होता. महाड- माणगाव- निजामपूर- कडापे- जिते  असा ५५ किलोमीटरचा प्रवास करून उंबर्डी गावात दाखल झालो. उंबर्डी नदीच्या तिरावर असलेलं हेमाडपंथी शिवमंदिर आणि त्यामागील मोसे खोऱ्यात दिमाखाने उभा असलेला कुर्डुगडाचा सुळका रस्त्यावरूनचं आमचं लक्ष वेधून घेत होता. फक्त दगड एकावर-एक रचून हे मंदिर उभारलं आहे. मंदिराच्या प्रांगणात बऱ्याच वीरगळ आणि सतीशिळा ...